



ॲड. प्रेरणा पद्माकर देशपांडे
- सन १९९० पासून नाशिक जिल्हा न्यायालयात वकीली
- अनेक सामाजिक संस्थांमध्ये सहभाग
- पीडित महिलांना मोफत कायदेशीर सल्ला
- समुपदेशन
- कायदेविषयक व्याख्याने
- आकाशवाणी कलाकार
- वृत्तपत्रात प्रासंगिक लेख
- दिवाळी अंकात लेख
नवप्रेरणा एंटरटेनमेंट
नवप्रेरणा एंटरटेनमेंट एकपात्री नाटक - स्वलिखित, स्वदिग्दर्शित, स्वअभिनीत
नवप्रेरणा एंटरटेनमेंट
फोटो गॅलरी
चित्रपट
- संसार माझा सोन्याचा
- नीलांबरी
- भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
- आई सप्तशृंगी
- थर्ड आय (हिंदी)
नाटकं
- खेळीया
- कोण म्हणतो टक्का दिला
- घाशीराम कोतवाल
- डार्लिंग - डार्लिंग
- सावली सूर्यप्रकाशाची
- करायला गेलो एक
- हा स्वर्ग सात पावलांचा
- मर्चंट ऑफ व्हेनिस (इंग्रजी)
- प्रस्ताव (हिंदी)
- यहा बंदे सस्ते मिलते है (हिंदी)
- बाईला बंगला कोतवाल चांगला (वगनाट्य)
- येरा गबाळ्याचे काम नोहे (वगनाट्य)
सुमारे २५ ते ३० नाटके, अनेक एकांकिका व बालनाट्ये
एकपात्री नाटक - स्वलिखित, स्वदिग्दर्शित, स्वाभिनीत
- मी द्रौपदी बोलतेय - स्त्री मनाचा हुंकार (मराठी)
- मैं द्रौपदी बोल रही हुं - स्त्री मन कि हुंकार (हिंदी)
या नाटकांचे प्रयोग चालू आहेत. आतापर्यंत ७७ प्रयोग झाले आहेत आणि पुढील काही प्रयोग नियोजित आहेत.
ठिकाण :- नाशिक, कल्याण, मुंबई, खालापूर (रायगड), पाचोरा, कळवण, निफाड, भोपाळ, देवास (मध्यप्रदेश), अमळनेर
- सीता - पहिली भारतीय परित्यक्ता
- मुक्ताई
- विविध नाट्यछटा
- कथाकथन - वयात आलेली मुलगी अचानक घर सोडून गेली तर....
- कथाकथन - बाळ आईच्या कुशीत विसावला कोर्टाच्या आदेशाने
- कथाकथन - मोडलेला संसार पुन्हा उभा राहिला
- कथाकथन - मनी नाही नांदणं अन् दिवाळीत चांदणं
काही मोजक्या प्रतिक्रिया
प्रेरणा मॅडम सप्रेम नमस्कार
काल आपला कार्यक्रम आमच्या श्री. लोकमान्य वाचनालयात राजीव नगर शाखा नाशिक येथे आयोजित केला होता. आपण आमच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमासाठी आलात याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद.
मी द्रौपदी बोलतेय हे आपलं एकपात्री अभिनय सादरीकरण अप्रतिम असच होतं. तुम्ही साक्षात द्रौपदी सर्व प्रेक्षक श्रोत्यांसमोर सादर केलीत !
द्रौपदीला साजेशी वेशभूषा, तिचा गोड आवाज, तिचं स्वरूप वर्णन असे एक एक पदर अगदी संवादातून साभिनय आपण साकार केलेत !. पाच पांडवांचे स्वभाव, त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत…. सुभद्रेचे, तसेच इतर स्त्री पात्रांचे बोलणे हे सुद्धा अगदी इतर व्यक्तींनी सादर केले असे वाटत होते.
द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग तुम्ही साभिनयातून सुंदररीत्या सादर केला. महाभारतातील प्रसंग अगदी डोळ्यासमोर पहात आहोत असे वाटत होते.अगदी एकपात्री अभिनय असून सुद्धा कला मंचावर सर्व कलाकार उपस्थित आहेत असे वाटत होते. अनेक प्रसंग आपण सादर करीत होतात तेव्हा सर्वांच्या अंगावर रोमांच व डोळ्यात दुःखाश्रू जमा होत होते व हे प्रसंग सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवले.
पूर्ण एक तास आपल्या वाणीचा प्रवाह अखंडितपणे वाहत होता. आपलं पाठांतर, सादरीकरण, अभिनय, पात्र अनुरूप आवाजातील बदल, चढउतार हे सगळंच आश्चर्यचकित करणारं होतं. सर्व श्रोते प्रेक्षक आपला कार्यक्रम अगदी एकाग्रतेने अनुभवत होते. हा कार्यक्रम असाच चालत राहावा असं वाटत होतं.
प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवण्याचं कौशल्य खरंच प्रशंसादायक आहे. हा कार्यक्रम प्रत्येकानं अनुभवावा असंच मनापासून वाटतं. आपले असेच कार्यक्रम वारंवार पहायला, अनुभवायला मिळोत हीच सदिच्छा!
आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मन: पूर्वक खूप खूप शुभेच्छा.
आपले हितचिंतक, सविताताई एरंडे (अध्यक्षा) आणि सुनील कुलकर्णी (सांस्कृतिक विभाग प्रमुख)
श्री. लोकमान्य वाचनालय, राजीव नगर शाखा. नाशिक.
नमस्ते मावशी
तुमच्या एकांकिकेतुन पाहिलेल्या मुक्ताई ला त्रिवार वंदन
तुम्ही यात जो अभिनय केला आहे, अगदी निशब्द आहे. त्याचे वर्णन करायला शब्दच नाही. अवर्णनीय आहे. तरीही माझ्या भावना तुम्हाला सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.
मी तुमची मुक्ताई हा एकपात्री प्रयोग पहिल्यांदाच पाहिला. त्यात मुक्ताईच्या पहिल्याच ज्या ओळी आहेत की माझे आयुष्य अवघे १७-१८ वर्षे आणि तुम्ही मला इतकी वर्षे स्मरणात ठेवले.. या वाक्याने अंगावर सरसरुन शहारे आले. डोळ्यात टचकण पाणी आले.
यात तुम्ही अगदी जीव ओतून अभिनय केला आहे. अभिनय म्हणजे अगदी सगळे चित्र आमच्या समोर उभे केले. आम्ही ते प्रत्यक्षात बघतो आहोत, जगतो आहोत हेच वाटत होते. तुमचा प्रेमळ, सात्विक, मंजुळ आवाज, त्या आवाजातले चढ उतार… हे सगळं प्रत्यक्षात बघतोय हे वाटत होते. एकांकिकेच्या शेवटपर्यंत कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातले पाणी थांबवता येत नव्हते. मी तर पूर्णपणे त्या विश्वात हरवले होते. नंतर पण खुप वेळ भारावलेले होते. 3 दिवसांपूर्वी एकांकिका पाहिली. रोज तुम्हाला या भावना सांगण्याचा प्रयत्न केला पण बघताना जितकं व्याकूळ होत होतं आणि डोळे भरुन येत होते तितकेच दर वेळी आणि आताही डोळे भरुन येता आहेत.
कारण तुमचा अभिनयच तितका दमदार आहे. तुमचं प्रत्येक वाक्य मनात कोरलं गेलं , काळजाला भिडलं त्यामुळे ते पूर्ण चित्र समोर दिसत होते आणि आम्ही अगदी भारावुन गेलो.
तसेच तुम्ही अगदी आजारी असतानाही क्षणभरही न थांबता पूर्ण एकांकिका सादर केली. सलाम तुमच्या कार्याला आणि अभिनयाला.
ही अतिशयोक्ती नाही करत मी , पण यापुढे या जन्मात जेव्हा मुक्ताई चे नाव ऐकेल तेव्हा तुमचाच चेहरा डोळ्यासमोर उभा राहील. इतका तुमचा आवाज, अभिनय मनावर कोरला गेला आहे.
मला लिहीता येत नाही पण माझ्या भावना पोहचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
तुमच्या रुपात पाहिलेल्या आणि तुम्हीच सादर केलेल्या मुक्ताईला त्रिवार वंदन.
– अनुजा सोनवणे
ता. ०५/१२/२३
खुप सुंदर दाद देणारे आहेत मॅडम तुमच्या आयुष्यात. आणि हीच सर्वात मोठी कमाई आहे तुमची. रसिकाच्या मनात घर करणे फार कमी जणांच्या नशिबात असते. खुप छान वाटते की आम्ही तुमच्याशी जोडलेले आहोत.
– चैताली कदम
३०/१०/२३
अप्रतिम असा एक पात्री अभिनय करतात. संत मुक्ताई या पात्राला ॲड. प्रेरणा देशपांडे मॅडम एकरूप होऊन प्रेक्षकांसमोर खरोखरच मुक्ताई साक्षात बोललात असे वाटते.
कार्यक्रम फारच छान आहे. मी सहमत आहे.
– डॉ. फड
काल आपला मुक्ताईचा जीवन प्रवास प्रथम शुभारंभ झाला. सुंदर हुबेहूब मेकप, सात्विक सोज्ज्वळरूप, मनमोहक वाणी, अत्युत्तम हावभाव. आम्ही जणू १२ व्या शतकात फील करत होतो. सर्वांग सुंदर सादरीकरण. तुमची चिकाटी आवड अद्भुत आहे. शब्द एकदम शुध्द. मन भारावून गेले. त्रिवार धन्यवाद. आम्ही भाग्यशाली आहोत प्रथम शुभारंभाचा प्रयोग पाहण्यासाठी आम्ही साक्षीदार आहोत. खूप यशस्वी प्रयोग झाला. पुढील भावी प्रयोगासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.🙏🙏
रविन्द्र कापडणे.
३०/१०/२३
🌷🌷🌷🙏🙏🙏नमस्कार
आदरणीय, ॲड. प्रेरणाताई.🌸
नाट्यकर्मी.
आपण एकपात्री नाट्यरूपाने सादर केलेली मुक्ताई सर्वांना भावली. सर्व प्रेक्षकांच्या वतीने व संयोजकाच्या वतीने मनापासून अभिनंदन, शुभेच्छा व धन्यवाद. आपण त्याचे श्रेय मला दिले. हेच आपले मोठेपण, सत्वगुण व हीच खऱ्या अर्थाने मुक्ताई 🙏. आपल्या ऋणात आहे. धन्यवाद.🙏 मी फक्त निमित्तमात्र आहे. सहजपणे मी आपल्याशी बोलून गेलो. मुक्ताई वर विचार करा व आपल्यात ते बीज रुपाने पेरल्या गेलं.🌾 नुसत बी पेरून चालत नाही तर त्याकरता त्याच योग्यतेची अंतरीची शेती असावी लागते व मशागत करावी लागते. ते आपल्याकडे मुळातच होते. नकळत लागलेल्या बियाचं महानाट्य रूपांतरित झालं. आपल्या नावातच प्रेरणा आहे. मुक्ताई उभे करणे ही वाटतं तेवढं सोपी बाब नाही. मुक्ताई हे दैवी चैतन्य आहे. व महान दैवी शक्ती निवृत्ती, ज्ञानदेव व सोपान यांची ती धाकटी बहीण पण ती आईच्या रूपाने त्यांच्या पाठीशी उभी राहिली. खरंतर मुक्ताई बाबत फार माहिती नव्हती व उपलब्धही नाही म्हणून वाटले होते कुणीतरी मुक्ताई या दैवी शक्तीला समाजापुढे सादर करावे. त्याकरता आपण योग्य आहात असे जाणवले व आपण ते केलेही कठीण प्रयत्न करून. असेच आपले प्रयोग उत्तरोत्तर होत राहो याकरता शुभेच्छा मनापासून ऋण व्यक्त करतो व शुभेच्छा देतो. धन्यवाद!!
– डॉ. विजय घाटगे
नमस्कार🙏🏻💐
मी रेवती पारख.
आपण आमच्या आम्ही साऱ्या जणीच्या कार्यक्रमात सादर केलेली द्रौपदी खुपच आवडली.
साजेशी वेशभूषा आणि उत्तम शब्दफेक, उत्तम लिखाण आणि एकूणच अप्रतिम सादरीकरण करून आम्हा महिलांची मने जिंकून घेतलीत.
धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!💐🍫
– रेवती पारख
२१/०१/२५
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सौ. प्रेरणा देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला ओघवात्या प्रवाहाप्रमाणे संथ गतीने पण लयीत, अलंकृत शब्दयोजना करून प्रेक्षागृह भाषाप्रभूत्वाने भारून टाकले. नव्हे मंत्रमुग्ध केले. याचे मर्म प्रेरणा देशपांडेच्या प्रतिभावंत, अभ्यासू, नाट्य अभिनय याची जाण व कल्पकतेने ऐनवेळी वापरलेल्या निवडक शब्द योजनेत आहे. प्रेरणाने स्टेजवर एकदा माईक हातात घेतल्यावर अशी जबरदस्त शब्द फेकीची आतिषबाजी ऐकायला मिळते की बस्स…! वाहव्वा क्या बात है ..? बहोत ही बढिया …! अब हिसके आगे कोई मिसाल ही नहीं है … ! अशी दाद प्रेक्षकांकडून मिळतेच मिळते. हि खासियत ॲड . सौ. प्रेरणा देशपांडे यांचे सूत्रसंचालनातं दिसून येते. प्रत्येक कलाकाराला त्याची कला सादर करण्यापूर्वी त्यांना सूत्र संचालिका अशी काही प्रेरणा देते कि तो /ती सजग होऊन सादरीकरणास प्रवृत्त होतो. सादरीकरण बद्दलचे वर्णन प्रेरणा देशपांडे असे लीलया करते कि, मराठी-हिंदी-इंग्रजी मधील स्फूटवचने, शेरोशायरी, इन्व्हर्जन्स यांचा बेमालूम वापर करून सादरीकरणाला साज-शृंगार चढविते आणि भाषण, गाणे, नाट्याभिनय याना पुष्टी मिळते. प्रेरणा देशपांडेला हे कसं बरं सुचतं ? तर तिने माईक हातात घेतल्यावर शब्दांच्या माळा तिच्या समोर फेर धरतात अन त्यापैकी नेमके शब्द निवडून तिचे सूत्रसंचालन सुरु असते.
अशी प्रतिभावंत, अभ्यासू, कल्पक प्रेरणा देशपांडे ही व्यवसायाने ॲडव्होकेट असून स्त्री मुक्ती चळवळ संस्था अंतर्गत पीडित महिलांना मोफत कायदेशीर सल्ला देते. आवड म्हणून स्वतः लिहून तयार केलेली “मी द्रौपदी बोलतेय” ! हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करणारी यशस्वी अभिनेत्री आहे.
यास्तव ॲडव्होकेट सौ. प्रेरणा देशपांडे यांचे मन:पूर्वक अभिनंदन व कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सृष्टी नियंता तिला अधिकाधिक यश देवो हीच सदिच्छा व शुभाशिर्वाद
पी . व्ही. शिरसाठ, नाशिक
– विकास नगरकर, अहमदनगर
– सुनंदा जरांडे
नमस्कार, प्रेरणा ताई, काल कुठे बाहेर गावी नसल्याने आम्हा दोघांना तुमची मुक्ताई ऐकण्याची संधी मिळाली. खूप छान वाटले. तुम्ही जी व्यक्तिरेखा साकार करता, ती प्रत्यक्षात अनुभवल्याचा आभास होतो. रेड्याच्या तोंडीचे वेद, देवतुल्य भावंडानी चालवलेली भिंत, पाठीवर भाजलेले मांडे, पैठणला केलेला जयजयकार, सर्व आम्ही सातशे, आठशे वर्षापूर्वीच्या काळात जाऊन प्रत्यक्ष अनुभवले. त्या काळची आळंदी, आळंदीतील कर्मठ प्रजा हे डोळ्यासमोर आले. तुमचे वाचन, पाठांतर साजेशी, सोज्वळ, साधी वेषभूषा,हावभाव सारेच शब्दातीत. तुमच्यातल्या अलौकिक गुणांना, प्रतिभेला मनःपूर्वक सलाम!
– सौ. वैशाली टेंभुर्णे
श्री काळाराम मंदीर संस्थान नाशिक येथील श्रीराम वसंतोत्सव २०२४ च्या कार्यक्रमात ॲडव्होकेट सौ. प्रेरणा देशपांडे यांना “मुक्ताई” या एकपात्री नाट्याभिनयास एक पुष्प गुंफण्याचे सौभाग्य दि. १८ एप्रिल २०२४ रोजी मिळाले..प्रेरणा ने स्वरचित कथानकास निवडक शब्द रचना व आवाजातील चढ उतार सोबत संगीताची साथ याद्वारे प्रेक्षकांवर अशी कांही जादू केली की सर्वांची ह्रदये हेलावली. विठ्ठल पंत व आई रूक्माई यांसह निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान अन् मुक्ताई यांचे चरित्र शब्द माधुर्यातून रेखाटले. जणू जिवंत व्यक्तींचा वावर होत आहे असा दृश्यभाव निर्माण झाला होता.
शब्दांचेच वाण, नवरसांचे बाण
भेदिली रसिक-ह्रदये नवरत्नांची खाण..
अप्रतिम शब्द रचना व बेमालूम शब्द फेकीने समस्तांवर गारूड केले. करूणरसाने तर परिसीमा गांठली; प्रेक्षकांचे डोळे ओलावले नव्हे काहीच्या डोळ्यांना धारा लागल्या. माझी मराठी बोलु कवतुके अमृताते पैजा जिंके ..! हे ज्ञानेश्वर माऊलीचे वक्तव्य प्रेरणाने प्रत्यक्षात उतरविले..तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. प्रेरणाचे “मुक्ताई” चे प्रचंड प्रयोग होवोत हीच शुभेच्छा..
पी . व्ही. शिरसाठ, नाशिक
आपण साक्षात मुक्ताई आमच्या समोर उभी केलीत, आम्हा सर्वांना आपण तेराव्या शतकात घेऊन गेलात. आपला अभिनय इतका जबरदस्त व अप्रतिम होता की, प्रेक्षकांचे डोळे पाणावले. मुक्ताईनं तुम्हाला झपाटल्याचं जाणवलं. खुप खुप छान !
आपण आपलं रोजचं कायदेकानूनची क्लिष्ट कामं सांभाळून नाट्य क्षेत्रात रस घेत आहात, हे कौतुकास्पद आहे .
आपल्या यानंतरच्या प्रत्येक नाट्य सादरीकरणात उपस्थित राहायचे ठरवले आहे.
भावी उज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा…
– अरविंद जाधव
काल रंगकर्मी प्रेरणा देशपांडेंनी उभी केलेली मुक्ताई अद्वितीय अशी होती. नेटकेपणाने व्यक्त केलेले संवाद, आवाजातील चढ उतार आणि प्रसंगानुरूप देहबोली यामुळे सर्वांना खिळवून ठेवले. दीड तास आम्ही देहभान हरपून नुसते जीवाचे कान करून ऐकत होतो आणि ज्ञानेश्वरांचे जीवनातील नाट्य प्रत्यक्ष बघितल्याप्रमाणे अनुभवत होतो. आणि नि:शब्द झालो होतो. खूपच सुंदर अभिनय होता तो.
– रवीन्द्र गोडबोले
ॲड. प्रेरणा देशपांडे यांनी सादर केलेला मुक्ताई हा एकपात्री आविष्कार अनुभवण्याचा योग नुकताच आला…..
एक अप्रतिम कलाविष्कार! संहिता, दिग्दर्शन, सादरीकरण सर्व काही प्रेरणा यांचेच!
नाथ परंपरेपासून मुक्ताईचे अनंतात विलीन होण्यापर्यंत अशा मोठ्या कालखंडातील सर्व चमत्कृती पूर्ण घटनांचा, धावता आढावा या कार्यक्रमातून घेतला आहे.
एका मागोमाग एक घटना उलगडत जाताना, या संहितेचे पाठांतर हे खूप मोठे आव्हान होते….. त्यांचे पाठांतर अचंबित करणारे होते. अभिनय आणि voice modulation चा सुंदर उपयोग करत हा एकपात्री प्रयोग संस्मरणीय केला.
आपले सादरीकरण अप्रतिम होते!
पुढील उपक्रमांसाठी मनःपुर्वक शुभेच्छा!
– भालचंद्र कुंटे
काल दि २१-०३-२०२४ रोजी द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने लोकमान्य टिळक सभागृहात ॲड. प्रेरणा देशपांडे यांचा मुक्ताई हा. एकपात्री नाट्यप्रयोग आयोजित केला होता.सदर नाट्यप्रयोगाचे वर्णन केवळ अप्रतिम या शब्दात केले तरी कमीच वाटते.
प्रेरणा देशपांडे यांनी मुक्ताई आणि भावंडांच्या जीवनाचा सखोल अभ्यास केल्याचे पदोपदी जाणवत होते.प्रवाही भाषेला अभिनयाची साथ आणि तांत्रिक पार्श्वसंगीत या सर्वांचा सुंदर मेळ असल्यामुळे नाट्यात जीवंतपणा होता.ज्ञानदेवांनी केलेल्या प्रत्येक चमत्काराचा प्रसंग डोळ्यासमोर घडत आहे असे वाटत होते त्यामुळे सर्व प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाटाच्या
रुपाने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.ज्ञानदेवांच्या समाधीच्या प्रसंगाने डोळे पाणावले.एकूणच हा नाट्यप्रयोग चिरस्मरणीय राहील. कार्यकारिणीने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद.
– दिनकर वि. कुलकर्णी
पुरस्कार
- सावित्री गौरव पुरस्कार २०२०
- महाराष्ट्र आयकॉन - वरिष्ठ फौंडेशन २०२०
- अखिल भारतीय वृत्तपत्र महिला गौरव पुरस्कार २०१६
- राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धेत मधुसूदन कालेलकर स्मृत्यर्थ ज्येष्ठ अभिनेत्री पुरस्कार २०१८. नाटक - "मी द्रौपदी बोलतेय - स्त्री मनाचा हुंकार"
- राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय प्रथम पुरस्कार १९९९
- कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत वैयक्तिक अभिनय प्रथम पुरस्कार १९९९. 'नाटक - "कोण म्हणतो टक्का दिला"'
- मुंबई येथे राज्यस्तरीय एकपात्री नाट्यस्पर्धेत मधुसूदन कालेलकर पुरस्कार. आतापर्यंत ७१ प्रयोग झाले आहेत आणि पुढील काही प्रयोग नियोजित आहेत. अनेक मान्यवरांनी हा प्रयोग वाखाणला आहे
लेख
- रसिक दिवाळी अंक २०२१
- पुण्यनगरी दिवाळी अंक २०१८
- इतर अनेक प्रासंगिक लेख
मुलाखती
- थिंक महाराष्ट्र (वेब पोर्टल)
- चित्रलेखा (मराठीतील दर्जेदार मासिक)
- इतर अनेक प्रासंगिक लेख
संपर्क
निवास
सदनिका क्र. ५, निर्मला अपार्टमेंट, राका कॉलनी शरणपूर रोड, नाशिक - ४२२००२
कार्यालय
चेंबर नं. २०२, बिल्डिंग नं. २, जिल्हा न्यायालय आवार, नाशिक
मोबाईल क्रमांक
९४२२७५९७४८
ईमेल
navpreranaentertainment@gmail.com